‘धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं’ अशा समाजमाध्यमांपासून अंतरानं कसं रहायचं, याच्या ‘शिकवण्या’ सुरू होण्याचा दिवस काही फार दूर नाही
समाजमाध्यमे वाईट अजिबातच नाहीत. वाईट आहे त्यांचा अतिरेक. प्रत्येक गोष्टीवर काहीतरी म्हटलंच पाहिजे, आपलं मत इतरांपर्यंत पोहोचलंच पाहिजे, हा आग्रह. तो असायलाही काही हरकत नाही. पण त्या अट्टाहासातून व्यक्त होण्याचं टोक गाठलं जातं आहे. तो ओरडतो आहे का, मग मी किंचाळेन. तो एखाद्याला नावं ठेवतो आहे का, मग मी त्याच्यापुढे जाऊन शिव्या देईन, हा विचार घेऊन बहुतांश जण समाजमाध्यमात वावरताना दिसतात.......